सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार रुपये जमा!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २५ आप्रिल २०२४ । महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. गेल्या वर्षी झालेल्या हिवाळी अधिवेशनात शिंदे सरकारने महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २०,००० रुपये एवढे बोनस देण्याचे जाहीर केले होते. अर्थात अलीकडेच त्याबाबत जीआर देखील जारी करण्यात आला होता. ज्यात महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला दोन हेक्टरच्या मर्यादेत बोनसची ही रक्कम दिली जाणार आहे.

राज्यातील २१ साखर कारखान्यांना कर्जाची हमी; २१ पैकी १५ कारखाने राजकीय नेत्यांचे!

धान अर्थातच भात हे महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे पीक आहे. याची लागवड पावसाळ्यात म्हणजेच खरीप हंगामात करतात. महाराष्ट्रातील विदर्भ विभाग हा भात उत्पादनासाठी विशेष ओळखला जातो. सरकारच्या माहितीनुसार, एका शेतकऱ्याला कमाल चाळीस हजार रुपयांपर्यंतचा बोनस मिळणार आहे. त्यानुसार, गोंदिया या प्रमुख धान उत्पादक जिल्ह्यांमधील पात्र धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली आहे. असे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

paid add

महाराष्ट्रातील ज्या धान उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारच्या पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी केलेली होती. त्यांना ही बोनसची रक्कम वितरित करण्यात आली आहे. खरेतर या बोनससाठी गोंदिया जिल्ह्यातील १ लाख २२ हजार ८१४ शेतकरी पात्र ठरले असून या पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना आता प्रोत्साहन अनुदान अर्थातच बोनस वितरित केले गेले असल्याचे सरकारी पातळीवरून सांगण्यात आले आहे. या संबंधित पात्र शेतकऱ्यांच्या बैंक खात्यावर बोनसचे २३५ कोटी ७६ लाख रुपये जमा करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे.

अवकाळी पाऊस राज्याची पाठ सोडेना; ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी!

मागील वर्षी महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १५००० रुपये आणि २ हेक्‍टर क्षेत्राच्या मर्यादेत बोनस वितरित करण्यात आला होता. बोनसची रक्कम ५००० रुपयांनी वाढवली गेली आहे. महाराष्ट्रातील धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी २०००० रुपये एवढी रक्कम बोनस स्वरूपात दिली जात आहे. तसेच, गोंदिया जिल्ह्यातील पात्र १ लाख २० हजार ८५५ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग धानाच्या बोनसची रक्कम पाठवण्यात आली असून उर्वरित १९५९ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर देखील लवकरच बोनसची रक्कम जमा केली जाणार आहे. त्यामुळे खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना भांडवलासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम