Weather Update । महाराष्ट्रात ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । २७ एप्रिल २०२४ । महाराष्ट्रात सध्या प्रचंड उकाडा जाणवत आहे. याशिवाय उन्हाची प्रचंड ताप देखील जाणवत आहे. काही भागांमध्ये ढगाळ हवामान तर काही भागांमध्ये पाऊस पडत आहे. दि. २७ एप्रिल २०२४ रोजी रात्रीपासून अमरावती जिल्ह्यातील काही भागात वर्षा सुरू आहे. बुलढाणा, शेगाव याठिकाणीही पाऊस झाला. त्याचप्रमाणे सकाळी अकोला जिल्ह्यातील अनेक जागी पाऊस झाला. ज्यामुळे सध्या या भागात सध्या काहीसे आनंदायी वातावरण आहे. अशातच आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

कापूस निर्यातीमध्ये १३७ टक्क्यांनी वाढ; हंगामातील दर घसरणीचा परिणाम!

पुढील दोन ते तीन दिवस मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. यात प्रामुख्याने आज दि. २७ एप्रिल २०२४ महाराष्ट्रात ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. ज्यामुळे या भागांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता होण्याचें हवामान विभागाने म्हटले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरणासहित अवकाळी पावसाची शक्यता ही २९ एप्रिलपर्यंत कायम असणार आहे. असेही हवामान विभागाने म्हटले आहे.

paid add

सव्वा लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर २० हजार रुपये जमा!

महाराष्ट्रात मागील २४ तासांमध्ये जळगाव या ठिकाणी उच्चांकी ४२.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर जळगाव व्यतिरिक्त सध्या चंद्रपूर ४२.६, वाशीम ४२.६, जेऊर ४२.५, धुळे ४२.०, मालेगाव ४२, अकोला ४२, वर्धा ४२ या ठिकाणी देखील तापमानाचा पारा ४२ अंशाहून अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच, महाराष्ट्रातील अन्य सर्वच भागांमध्ये कमाल तापमान हे ४२ अंशांहुन अधिक असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच आता किमान तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईसोबतच कोकण पट्ट्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम