राज्यातील ‘या’ जिल्ह्यातील १४ हजार शेतकरी अपात्र !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २६ ऑक्टोबर २०२३

महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आली होती. त्याचवेळी नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र लाभ मिळणार नव्हता. तत्कालीन उद्धव ठाकरे सरकारने अशा शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना लागू करण्यात आली. नियमित पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याची योजना राज्य सरकारने गुंडाळली आहे. जिल्ह्यातील १४ हजारांवर शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळण्यापासून विविध कारणांखाली अपात्र ठरवून वंचित ठेवण्यात आले आहे.

paid add

या योजनेंतर्गत आतापर्यंत १७ हजार ८०१ शेतकऱ्यांना सुमारे ८१ कोटी ११ लाखांचे वाटप करण्यात आले आहे. परंतु यातून प्रतीक्षेत असलेल्या सुमारे १४ हजार शेतकऱ्यांना विविध कारणांमुळे अपात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील १ लाख २० हजार थकबाकीदार शेतकऱ्यांना ८५७ कोटींची कर्जमाफी देण्यात आलेली आहे. याशिवाय नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी २०१७ ते २०१९ या तीन आर्थिक वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांत कर्जाची उचल करून नियमितपणे पूर्ण परतफेड केलेल्या असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे.

तीन वर्षांपैकी दोन वर्षे जरी कर्ज नियमितपणे परतफेड केलेले असेल अशा शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. तसेच एखादा शेतकरी मृत झाल्यानंतर त्याच्या असलेल्या वारसांनी कर्ज परतफेड केली असल्यास त्या वारसदारालाही या योजनेचा लाभ आता घेता येणार आहे. या योजनेसाठी जिल्ह्यातील ३२ हजार ६३३ शेतकरी पात्र होते. यापैकी १८ हजार ९२५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले आहे. यापैकी १७ हजार ८०१ खातेदारांना प्रत्येकी ५० हजार, याप्रमाणे ८१ कोटी ११ लाख रुपयांचा लाभ मिळालेला आहे. अद्यापही जिल्ह्यातील १४ हजारांवर शेतकरी लाभाच्या प्रतीक्षेत असताना त्यांची नावे निकषात अपात्र असल्याचे सहकार विभागाने सांगितले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम