शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी : कांद्याच्या दरात मोठी वाढ !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २७ ऑक्टोबर २०२३

देशभरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. सध्या कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सध्या विक्रीसाठी कांदा आहे, त्यांना फायदा होत आहे. सध्या बहुतांश शेतकऱ्यांकडे विक्रीसाठी कांदाच शिल्लक नाही. त्यामुळं शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. ज्यावेळेस शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात कांदा होता, त्यावेळी त्याला दर नव्हता. आता शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक नसताना कांद्याच्या दराला झळाळी आली आहे. कांद्याच्या दराच्या बाबतीत सध्या शेतकऱ्यांमध्ये ‘कही खुशी कही गम अशी स्थिती आहे. कांद्याला भाव वाढले पण कांदा शिल्लक नसल्याचे दुःख शेतकऱ्यांना आहे.

paid add

कांद्याला सरासरी 4 हजार 800 ते जास्तीत जास्त 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळत आहे. कांद्याला चांगला दर मिळत असताना शेतकऱ्यांकडे मात्र, विक्रीसाठी कांदा शिल्लक नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडे फारसा कांदा शिल्लक राहिलेला नसताना कांद्याचे भाव आता चांगलेच वधारु लागले आहेत. नाशिक जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांद्याला सरासरी 4 हजार 800 रुपये तर जास्तीत जास्त 5 हजार 500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळू लागला आहे. भाववाढीच्या आशेत शेतकऱ्यांचा बहुतांश कांदा यापूर्वीच विकला गेला आहे. तर ठेवलेला काही कांदा सडल्यानं शेतकऱ्यांकडे फारच कमी कांदा शिल्लक राहिला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम