कृषी सेवक I २३ डिसेंबर २०२२ I बाजारात आता संत्रा दाखल झालाय. संत्र्याची बाजारातील आवकही हळूहळू वाढतेय. पण बदलत्या वातावरणामुळं संत्र्याला मिळणारा उठाव कमी दिसतोय.
त्यामुळं शेतकऱ्यांना अपेक्षित दर मिळत नाही. नागपूरसह महत्वाच्या बाजारांमध्ये संत्र्याची आवक जास्त दिसतेय. त्यामुळं संत्र्याला २ हजार ५०० रुपये ते ५ हजार रुपये दर मिळतोय. उन्हाचा चटका वाढल्यानंतर संत्र्याला चांगला दर मिळू शकतो, असा अंदाज संत्रा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम