कृषी सेवक I २३ डिसेंबर २०२२ I गेल्यावर्षी २३ डिसेंबरपर्यंत देशात १०२ लाख ६५ हजार हेक्टरवर हरभरा पीक होतं. तर यंदा याच तारखेपर्यंत १०३ लाख ३७ हजार हेक्टरवर हरभरा लागवड झाली. म्हणजेच सध्या केवळ ७० लाख हेक्टरवरनं क्षेत्र जास्त आहे.
पण अद्याप हरभरा पेरा पूर्ण झालेला नाही. मागील वर्षभर दर दबावात असल्यानं शेतकरी हरभऱ्याचा पेरा कमी करु शकतात. तुरीच्या बाबतीत यंदा हाच अनुभव आला. तुरीचे दर सरकारनं वर्षभर दबावात ठेवल्यामुळं शेतकऱ्यांनी खरिपात तूर लागवड केमी केली. त्याचा परिणाम आता तूर बाजारावर जाणवतोय. हरभऱ्याच्या बाबतीतही हेच घडू शकतं, असा अंदाज सध्यातरी व्यक्त केला जातोय.
मात्र शेवटी हरभरा पेरणी किती होते? उत्पादन किती मिळते? यावर सर्व गणित अवलंबून आहे. सध्या देशातील बाजारात हरभऱ्याला सरासरी ४ हजार ३०० ते ४ हजार ७०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळतोय. हा दर हरभरा लागवडीचं चित्र स्पष्ट होईपर्यंत कायम राहू शकतो, असा अंदाज हरभरा बाजारातील जाणकारांनी व्यक्त केलाय.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम