नांदेड जिल्ह्यात २६९ गुरांचा लम्पी स्कीन आजाराने मृत्यू

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३० नोव्हेंबर २०२२ I जिल्ह्यात लम्पी स्कीन आजाराचा फैलाव अधिक प्रमाणात होत आहे. आजपर्यंत जिल्ह्यातील २६९ गाय वर्ग जनावरांचा (Animal) या आजाराने मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त कार्यालयाकडून मिळाली.

 

paid add

जिल्ह्यात मागील अनेक दिवसापासून गाय वर्ग जनावरांना लम्पी आजाराने ग्रासले आहे. गाय वर्ग पशुधनातील लम्पी आजाराचा अधिक फैलाव होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनातर्फे व्यापक लसीकरणासह जनावरांच्या स्वच्छतेबाबत जनजागृती केली जात आहे. जिल्ह्यातील एकूण २२० बाधित गावात चार हजार ६६३ गाय वर्ग पशुधनाला लम्पी स्कीनची बाधा झाली आहे. आतापर्यंत या आजाराने २६९ पशुधन मृत्यूमुखी पडले आहे. या आजारातून बरे झालेले पशुधनाची संख्या तीन हजार ९६ आहे. औषधोपचार चालू असलेले पशुधन एक ३०४ आहे. सद्यःस्थितीत लसीकरण मोठ्या प्रमाणात केले जात आहे. आजपर्यंत चार लाख २६ हजार ३१ प्रागतिक लसीकरण पूर्ण झाले आहे. मृत पशुधनाच्या लाभार्थ्यांची संख्या १४० वर पोचली आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध लसमात्रा असून पशुपालकांनी लसीकरणासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एम. आर. रत्नपारखी यांनी केले.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम