सोयाबीनचे भाव वाढण्याची शक्यता

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३० नोव्हेंबर २०२२ I गेल्या आठवड्यात देशातील व राज्यातील प्रमुख बाजारपेठांमध्ये सोयाबनच्या दरात काहीशी घट झाली होती. शेतकऱ्यांना सरासरी ५४०० ते ५५०० रूपये दर मिळाला. परंतु आता आठवडाभरात सोयाबीनचे भाव प्रति क्विंटल सुमारे १०० रूपयांनी वाढण्याची शक्यता आहे. शेतकरी टप्प्याटप्प्याने माल बाजारात आणत आहेत. त्यामुळे बाजारात आवक कमी आहे. त्याचा परिणाम प्रक्रिया उद्योगावर झाला आहे. तसेच मलेशियात पामतेलाच्या किंमतीत सुधारणा झाली आहे. मलेशियात पामतेलाच्या किंमतीत ३ टक्के वाढ झाली आहे. क्रुड ऑईल म्हणजे कच्च्या तेलाच्या किंमतीतील घसरणही थांबली आहे. त्यामुळे आठवडाभरात सोयाबीनचे दर सुधारण्याचा अंदाज आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम