मालदीवला ३५,७४९ टन कांद्यासह, साखर, अंडी निर्यात होणार; केंद्र सरकारची परवानगी!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ एप्रिल २०२४ | देशातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. शुक्रवारी दि. ५ एप्रिल २०२४ केंद्र सरकारने मालदीव या देशाला कांदा, बटाटा, अंडे, तांदूळ, गव्हाचे पीठ, साखर आणि डाळींची निर्यात करण्यास मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारच्या झालेल्या निर्णयानुसार, भारताकडून मालदीवला ३५,७४९ टन कांदा, २१,५१३ टन बटाटा, ४३ कोटी अंडे, सव्वा लाख टन तांदूळ, १ लाख ९ हजार टन गव्हाचे पीठ, ६४,४९४ टन साखर तर सव्वा दोनशे टन डाळींची निर्यात करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे.

 

मालदीव आणि भारत या दोन देशांमधील द्विपक्षीय करारानुसार या सर्व शेतमाल वस्तूंची निर्यात केली जाणार आहे. परिणामी, सध्या भारतात कांद्याचे दर घसरलेले असताना ३६ हजार टन कांदा निर्यातीला परवानगी मिळाल्याने, कांदा दराला अल्प का होईना. मात्र, बळ मिळण्यास मदत होणार आहे. याशिवाय भारतातून जवळपास ४३ कोटी अंडे मालदीवला पाठवली जाणार आहे. सध्याच्या घडीला अंड्याचे दर घसरलेले आहेत. याचा पोल्ट्री उद्योगाला देखील काहीसा फायदा होणार आहे. तर बटाटा उत्पादक शेतकऱ्यांना देखील या निर्णयामुळे दिलासा मिळणार आहे.

 

paid add

भारताने मालदीव या देशासोबत सलोख्याचे सैन्य संबंध निर्माण करण्यावर भर दिला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये भारताचे मालदीवसोबत संबंध काहीसे खराब झाले होते. परंतु, सध्या दोन्ही देशांकडून त्यात सुधारणेसाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सध्याच्या घडीला भारत सरकारने मालदीवला तांदूळ, गव्हाचे पीठ, कांदा, बटाटा, अंडे, डाळी, साखर निर्यात केली जाणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम