तरुणाचे नोकरीला रामराम; सेंद्रिय शेतीतून महिन्याला कमवतो २ लाख रुपये!

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ७ एप्रिल २०२४ | इंजिनिअर तरुणाच्या शेती व्यवसायामधील यशाबद्दल आपण आज जाणून घेऊ. जो सेंद्रिय भाजीपाला पिकांच्या लागवडीतुन महिन्याला २ लाखांची कमाई करत आहे. सत्य प्रवीण असे सदर युवा शेतकऱ्याचे नाव आहे, सत्य प्रवीण हा ओरिसा राज्यातील रायगडा जिल्ह्याचा रहिवासी असून त्याने इंजिनीरिंगपर्यंत शिक्षण घेतले आहे.

सत्य प्रवीणने आपल्या शिक्षणाच्या जोरावर विदेशात काही काळ नोकरी केली. सत्य प्रवीण मलेशिया देशामध्ये आयटी इंजिनिअर म्हणून काम करत होते. परंतु, विदेशातील नोकरीत मन नसल्याने, त्याने मायभूमीची वाट धरली. त्यांना नोकरीत वेतनही चांगले मिळत होते. परंतु, शेतीसोबत नाळ जोडलेली असल्याने, शेती करण्याची इच्छा त्यांना माघारी आपल्या मातीमध्ये घेऊन आली.

सत्य प्रवीण यांची गावी वडिलोपार्जित शेती आहे. शेतीमध्ये सत्य प्रवीण यांनी ठिबक सिंचन व्यवस्था उभारली आहे. सत्य प्रवीण हे सर्व पिकांची लागवड आधुनिक पद्धतीने करत आहे. आपल्या सर्व जमिनीमध्ये ते बाजारातील अंदाज पाहून भाजीपाला पिकांचे उत्पादन घेतात. विशेष म्हणजे ते आपल्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारची रासायनिक खते न वापरता सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला पिकांचे उत्पादन घेत आहेत. सेंद्रिय पद्धतीने उत्पादित आपला सर्व माल ते जवळच्या शहरांमधील मॉलला पाठवता तसेच काही माल बाजार संमित्यांमध्ये देखील पाठवत असतात.

टोमॅटो हे सत्य प्रवीण यांचे मुख्य पीक आहे. अन्य भाजीपाला पिके ते त्या-त्या कालावधीत मार्केटचा अंदाज पाहून घेतात. सत्य प्रवीण यांना भाजीपाला शेतीतून महिन्याला २ लाखांची कमाई होत असल्याचे ते सांगतात. एकाच पिकाच्या मागे न लागता, पिकांमध्ये विविधता आणल्याने आपल्याला शक्यतो तोटा होण्याचा धोका कमी असतो, असेही सत्य प्रवीण हे सांगतात. सत्य प्रवीण यांनी आपल्या शेतीमध्ये जवळपास ६० लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम