तुरीच्या भावात ५०० रुपयांची घसरण; शेतकरी परेशान!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ०२ मे २०२४ । तूर आणि सोयाबीनच्या बाजारभावात सध्या मोठी घसरण चालू झाली आहे. ५ दिवसांपूर्वी किंचितशी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा या आठवड्यात सोयाबीन व तुरीच्या दरात चांगलीच घसरण झाल्याचे आढळून येते आहे. सरासरी ४३०० रुपये भाव असल्याने आणखी किती दिवस सोयाबीन घरात ठेवायचे? असा प्रश्न सध्या शेतकर्‍यांना पडत आहे.

साखरेच्या एमएसपीत वाढ होण्याची दाट शक्यता!

शेतीत नानाविध प्रयोग करीत अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न शेतकरी करीत असल्याचे दिसून येते. एकीकडे रासायनिक खते, बी-बियाणे, मजुरी, मशागत खर्चात भरमसाठ वाढ होत आहे तर अलीकडे शेतमालाच्या किमतीत फारशी वाढ होत नसल्याने आर्थिक ताळमेळ बसविणे शेतकर्‍यांच्या आवाक्या बाहेर जात आहे. २०२३ च्या खरीप हंगामात शेतकर्‍यांना नैसर्गिक आपत्तिला सामोरा जावे लागले.

मारपीट व अवकाळी पावसामुळे तूर पि‍कालाही फटका बसला होता. नवीन सोयाबीन विक्रीसाठी बाजार समित्यांत दाखल झाल्यानंतर सुरुवातीला ४४०० ते ५१०० या दरम्यान भाव मिळाला मध्यंतरी सोयाबीनला प्रति क्विंटल सरासरी ५४०० रुपये भाव मिळाला होता. १४ एप्रिलपर्यंत पाच हजारापर्यंत भाव मिळाला. आता पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण सुरु झाल्याचे दिसून येते. वाशिम जिल्ह्यात किमान ४२०० ते कमाल ४५०० रुपये असा भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपले; अनेकांचे संसार उघड्यावर!

१५ दिवसांपूर्वी तुरीला प्रति क्विंटल कमाल १२,५०० रूपयांपर्यंत भाव मिळाला. आता कमाल ११,७०० रुपये असा भाव मिळत आहे. जवळपास प्रति क्विंटल ८०० रुपयांची घसरण झाल्याने याचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम