२ म्हशींपासून सुरु केलाला दुग्ध व्यवसाय आज जाऊन पोचलाय ४० म्हशींपर्यंत; महिन्याला 3 लाख कमाई!

बातमी शेअर करा

कृषी सेवक । ५ मे २०२४ । जालना जिल्ह्यातील शहापूरकर कुटुंबाने ४० म्हशींच्या पालनातून महिन्याकाठी ३ लाखांचा निव्वळ नफा मिळवत दुग्ध व्यवसायात यशाचा पायंडा घालून दिला आहे. विशेष म्हणजे डेअरी व्यवसाय हा त्यांचा वडिलोपार्जित व्यवसाय असल्याने, त्यांच्या तीन पिढ्या या व्यवसायातून समृद्ध झाल्या आहेत.

सोलापूरचे असलेले शहापूरकर कुटुंब १९६० च्या दशकात जालन्यात स्थायिक झाले. किरण शहापूरकर यांचे आजोबा जालना जिल्ह्यातील निधोना येथे वास्तव्यास आले. त्यांनी केवळ दोन पंढरपुरी म्हशींपासून दुग्ध व्यवसायाला सुरुवात केली. या व्यवसायात पुढे किरण यांच्या वडिलांनीही योगदान दिले. आता त्यांच्या तीन नातवांनी दुग्ध व्यवसाय वाढवला आहे. आपला गोठा तब्बल ४० म्हशींपर्यंत विस्तारला आहे. ज्यातून सध्या त्यांना ४० म्हशींच्या पालनातून महिन्याकाठी ३ लाखांचा निव्वळ मिळत असल्याचे किरण शहापूरकर सांगतात.

किरण शहापूरकर सांगतात, आपल्या गोठ्यातील ४० म्हशींपासून दररोज १५० ते २०० लिटर दूध निघते. हॉटेल व्यवसायिक तसेच घरगुती ग्राहकांना ७० ते ८० रुपये प्रति लिटर या दराने या दुधाची विक्री होते. दोन दिवसाला १२ ते १५ हजार रुपये मिळतात. म्हशींसाठी लागणारा चारा आणि इतर खर्च वगळून दहा हजार रुपये निव्वळ हातामध्ये असतात. अशाप्रकारे महिन्याकाठी निव्वळ तीन लाखांचे उत्पन्न शहापूरकर बंधू कमावत आहे. या उत्पन्नातूनच एक टुमदार घरही बांधल्याचे ते सांगतात.

१९ वर्षीय तरुणी रमली शेतीमध्ये; स्वतः टेम्पो चालवून शेतमाल विक्रीसाठी जाते मार्केटला!

शहापूरकर सांगतात, आमच्या आजोबांनी हा व्यवसाय सुरू केला आणि आम्ही हा व्यवसाय वाढवत नेला. या व्यवसायामध्ये स्वतः काम करावे लागते. इतरांच्या भरोशावर हा व्यवसाय चालत नाही. पहाटे चार वाजता उठून आम्ही म्हशींचे शेण काढणे, त्यांना वैरण देणे तसेच दूध काढण्याचे काम करतो. त्यानंतर एक जण जालना शहरात दुधाची विक्री करण्यासाठी जातो.

पहाटे दहा वाजेपर्यंत म्हशींची सगळी कामे आवरतात. १० वाजेच्या सुमारास म्हशींना पाणी दिले जाते. त्यानंतर दुपारी ३ वाजता त्यांची वॉशिंग केली जाते. पुन्हा सायंकाळच्या नियोजनात सुरुवात होते. सायंकाळी पुन्हा एकदा वैरण टकणे दूध काढणे अशा प्रकारचे नियोजन असते, असे किरण शहापूरकर यांनी सांगितले.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम