सरकारी तांदूळ खरेदीत ९ टक्के वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I केंद्र सरकार २३ पिकांच्या किमान आधारभूत किंमती म्हणजे हमीभाव जाहीर करते. परंतु तांदूळ व गहू या दोन पिकांचीच मोठ्या प्रमाणावर खरेदी करते. चालू वर्षीही सरकारने तांदूळ खरेदी वाढवलीय. गेल्या वर्षीच्या तुलनेत तांदळाची खरेदी सुमारे ९ टक्के वाढली आहे.

 

पंजाब, हरियाणा, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांमधून तांदळाची जास्त खरेदी करण्यात आली आहे. दरवर्षी साधारणत: ऑक्टोबरमध्ये मॉन्सून परतल्यानंतर लगेचच सरकारकडून तांदूळ खरेदी सुरू होते. तथापि, दक्षिणेकडील राज्यांमध्ये, विशेषत: केरळ आणि तामिळनाडूमध्ये तांदूळ खरेदी एक महिना आधीच म्हणजे सप्टेंबरपासून सुरू होते. पंजाबमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत तांदूळ खरेदीत २.७६ टक्के घट झाली आहे. हरियाणामध्ये मात्र तांदूळ खरेदी ८.१८ टक्क्यांनी वाढली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम