तेलंगणामध्ये रब्बी कापूस लागवडीचा प्रयोग

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ३ डिसेंबर २०२२ I तेलंगणामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची उपलब्धता झाल्यामुळे रब्बी हंगामात कापसाची लागवड करण्याचे प्रमाण वाढले आहे. खरीप हंगामात सोयाबीन, भात, मूग, ज्वारी आणि मक्यासारखी पिके घेतल्यानंतर रब्बी हंगामात कापूस लागवडीचा प्रयोग केला जात आहे.

परंतु शास्त्रज्ञांनी मात्र या प्रयोगाबद्दल शेतकऱ्यांना धोक्याचा इशारा दिलाय. रब्बी कापसामुळे गुलाबी बोंड अळी शेतात वाढते आणि खरीप कापूस वाढेपर्यंत ती शेतात कायम राहते. दुसरं म्हणजे वाढत्या तापमानाचा पिकाला फटका बसतो. रब्बी कापूस जर फेब्रुवारीच्या आसपास फुलोऱ्यात आला तर वाढत्या तापमानामुळे उत्पादनात मोठी घट होते. रब्बी कापूस हा केवळ एक प्रयोग म्हणून ठीक आहे; परंतु त्याची मोठ्या प्रमाणावर लागवड करणे चुकीचे ठरेल, असे शास्त्रज्ञांचे मत आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेनेही शेतकऱ्यांना रब्बी हंगामात कापूस लागवडीसाठी प्रोत्साहन देऊ नये, असे म्हटले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम