कृषी सेवक | १९ मे २०२४ | बुलढाणा जिल्ह्यातील ९४,००० शेतकरी ई-केवायसी न केल्यामुळे पीएम किसान सन्मान निधीच्या लाभांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. तसेच, ई-केवायसी न केल्यामुळे अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणे किंवा इतर शासकीय योजनांचा लाभ घेणेही कठीण होईल.
७०० रुपये प्रति क्विंटलवर आलेले केळीचे दर आता पुन्हा वाढले; वाचा काय मिळतोय सध्या दर
ई-केवायसी पूर्ण केल्याशिवाय शेतकऱ्यांची लाभाची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सांगितले. आतापर्यंत जिल्ह्यातील १०,४२,८२४ शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली असून, यातील ८,२४,८३१ शेतकऱ्यांच्या माहितीला मंजुरी देण्यात आली आहे. मात्र, २,३६,२७७ शेतकऱ्यांची माहिती अद्याप अपलोड करायची आहे. विविध योजनेंतर्गत ७,१६,८३९ शेतकऱ्यांना लाभाचे वाटप करण्यात आले आहे, परंतु ९४,६२८ शेतकऱ्यांची ई-केवायसी प्रलंबित असल्यामुळे त्यांना लाभाची रक्कम मिळालेली नाही.
शेतकऱ्यांनी राज्य शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी तातडीने ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसीअभावी लाभापासून कोणताही शेतकरी वंचित राहू नये, यासाठी त्यांनी संबंधित तालुका कृषी कार्यालय आणि तालुक्यातील कृषी सहायकांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी केले.
जाणून घ्या लाल आणि उन्हाळ कांद्याचे सरासरी किती मिळाले दर !
नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या ८०,७०० शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षांत भरपाई मिळालेली नाही. जिल्ह्यातील शेतीला ६८० कोटी रुपयांचे नुकसान नैसर्गिक आपत्तींमुळे झाले होते.
तालुकानिहाय ई-केवायसी प्रलंबित असलेले शेतकरी:
– चिखली: १७,५०७
– लोणार: ११,४६३
– बुलढाणा: १०,४५४
– मेहकर: १०,६३७
– देऊळगाव राजा: ७,८९४
– चिखली राजा: ७,४५५
– संग्रामपूर: ६,५०२
– नांदुरा: ६,२७१
– जळगाव (जा.): ५,८९७
– मलकापूर: ३,५११
– शेगाव: २,७७२
– मोताळा: २,४९३
– खामगाव: १,७७२
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम