घरच्या घरी फळे आणि भाजीपाला साठवण्यासाठी शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष उभारण्याची पद्धत

बातमी शेअर करा

कृषि सेवक | १९ मे २०२४ | फळे आणि भाजीपाल्याची नासाडी टाळण्यासाठी आणि त्यांना चांगला बाजार भाव मिळण्यासाठी शेतकरी आपल्या शेतात शून्य उर्जेवर आधारित शितकक्ष म्हणजेच झीरो एनर्जी कूल चेंबर उभारू शकतात. यासाठी कोणत्याही प्रकारची उर्जेची आवश्यकता नसते. हा शितकक्ष बांधायला अत्यंत सोपा आणि कमी खर्चिक आहे.

ई-केवायसी न केल्यामुळे ९४,००० शेतकरी पीएम किसान सन्मान निधीपासून वंचित

शितकक्ष उभारणीची पद्धत

बाष्पीभवनाच्या थंडपणा या तत्त्वावर शून्य उर्जेवर आधारित शितकक्षाची रचना करण्यात आलेली आहे. ह्या शीतकक्षाची उभारणी विटा, वाळू, बांबू, गवत, पोती अशी सहज उपलब्ध साधने वापरून करता येते. ह्या कक्षातील तापमान बाहेरील तापमानापेक्षा सुमारे १०-१५ डिग्री सेल्सियसने कमी असते आणि आर्द्रता ८५ ते ९५% असते. या शितकक्षाची रचना हौदासारखी असते.

याची उंची ६७.५ सेंटीमीटर उंचीच्या दोन भिंती घालून या दोन भिंतीमधील अंतर ७.५ सेंटीमीटर ठेवावे. भिंतींमधील दोन पोकळीत बारीक चाळून ओली वाळू भरावी, रुंदी ११५ सेंटीमीटर आणि लांबी १६५ सेंटीमीटर ठेवावी.

शितकक्षाची देखभाल

वाळू, विटा व वरचे छप्पर सतत ओले ठेवावे. यासाठी दररोज सकाळी आणि संध्याकाळी दोन वेळा पाणी देऊन भिंत चांगली ओली करावी. शक्य असल्यास पाण्याच्या टाकीला जोडलेली ठिबक सिंचन यंत्रणा वापरावी. शीतकक्षातील तापमान आणि आर्द्रतेचे नियंत्रण करण्यासाठी दिवसातून दोन वेळा पाणी दिल्याने विटा थंड होतात.

जोरदार पाऊस पडणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात दाखल होईल

शितकक्षात साठवलेली फळे आणि भाजीपाल्याची उष्णता पाणी शिंपडल्याने बाहेर काढून टाकली जाते. यामुळे फळे आणि भाजीपाल्याचे आयुष्य वाढते. त्याचबरोबर फळे आणि भाजीपाला ताजे, टवटवीत दिसतात. तसेच वजनातील घट कमी होते. फळ पिकण्याची प्रक्रिया हळूहळू आणि समान होते.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम