शेतकरी समाधानी : बाजारात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १२ नोव्हेबर २०२३

दिवाळीच्या सणाचा जल्लोष देशभरात पाहायला मिळत असून दिवाळीसाठी बाजारपेठा खुलून गेल्या असून फुले, दिवे खरेदीसाठी लोकांची लगबग सुरू आहे. ऐन दिवाळीत झेंडूच्या फुलांचे दर वाढल्याने बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

paid add

दीपावली या दिवशी झेंडूच्या फुलांना विशेष महत्त्व असते. घराच्या प्रवेश द्वारावर वाहनांना झेंडूच्या फुलांपासून बनवलेला हार लावला जातो. त्यामुळे आज नाशिकच्या गंगाघाट परिसरात झेंडूची फुल विक्रेते पहाटे पासूनच दाखल झाले होते. पहाटेपासून झेंडू खरेदीला नागरिकांची देखील मोठी गर्दी केली होती. गाडगे महाराज पटांगणात हा झेंडूच्या फुलांचा बाजार दरवर्षी प्रमाणे यंदाही भरला आहे. यंदा देखील मार्केटमध्ये लाल झेंडू, पिवळा झेंडू,शेवंती, गुलाब, कमळ आदी फुले विक्री हेतू दाखल झाले आहेत. दसऱ्याला शेतकर्यांचे हाल झाले होते समाधान कारक भाव न मिळाल्याने शेतकरी असमाधानी होता.

मात्र आजच्या दिवशी म्हणजेच दिवाळीला झेंडुला चांगला भाव मिळाल्याने झेंडू विक्रेते समाधानी आहेत. आवक कमी असल्याने भावात रुद्धी झाली आणि दसऱ्याची कसर ही यंदा दिवाळीत भरून निघाली आहे. आज झेंडूच्या फुलांना 400 ते 500 रुपये केरेट आणि 150 ते 200 रुपये शेकडा भाव मिळाला आहे. सणासुदीच्या काळात फुलांचे दर वाढल्याने बळिराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम