१५० पिल्लांना जन्म देणाऱ्या म्हशीची किमत आहे ११ कोटी !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २१ नोव्हेबर २०२३

देशभरातील अनेक शेतकरी शेतीसोबत पशुपालन देखील मोठ्या संख्येने करीत असतात, शेतीसोबत केलेल्या या व्यवसायामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. जर तुम्हाला या व्यवसायात जास्त नफा मिळवायचा असेल तर तुम्हाला जास्त दूध देणाऱ्या जनावरांची निवड करावी लागेल. तसेच त्यांच्या आहाराची आणि आरोग्याचीही तुम्हाला जास्त काळजी घ्यावी लागेल.

राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील पुष्कर येथे एक आंतरराष्ट्रीय पुष्कर मेळा भरला आहे. या मेळ्यामध्ये एका म्हशीने सर्वाचं लक्ष वेधून घेतले आहे. किमतीचा विचार केला तर या म्हशीची किंमत 11 कोटी रुपये इतकी आहे. हरविंदर सिंह असे या म्हशीच्या मालकाचे नाव आहे. आतापर्यंत 8 वर्षांच्या अनमोलने प्रजननातून 150 पिल्लांना जन्म दिला असून ती मुर्राह जातीची आहे. 5.8 फूट उंच आणि तब्बल 1570 किलो वजन आहे.

मागील वर्षी त्याचे वजन 1400 किलो इतके होते. या म्हशीला रोज एक किलो तूप, पाच लिटर दूध, एक किलो काजू-बदाम, चणे आणि सोयाबीन खाण्यासाठी देतात. या म्हशीसोबत दोन लोक नेहमी असतात, ज्याचा त्यांना पगारही दिला जातो. म्हशीला प्रत्येक महिन्याला 2.50 ते 3 लाख रुपये खर्च येतो, असा दावा केला जात आहे. मागील वर्षी म्हशीची किंमत अंदाजे 2.30 कोटी रुपये इतकी होती. यावेळी म्हशीची किंमत 11 कोटी रुपये निश्चित केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम