कृषीसेवक | २१ नोव्हेबर २०२३
राज्यातील अनेक जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस न झाल्याने अनेक शेतकरी चिंतेत आहे तर काही भागात अपुऱ्या पावसामुळे शेतकरीवर्ग संकटात आला असून खरीप हंगामातील पिके पाऊस नसल्याने करपून गेली होती. सध्या रब्बी हंगामाची लगबग सुरु आहे. खरीप हंगाम वाया गेल्याने शेतकऱ्यांना आता रब्बी हंगामाकडून अपेक्षा आहे. परंतु हा हंगाम देखील धोक्यात आला आहे. याला कारण आहे वीज. सध्या शेतकरीवर्ग पीक पेरणीचे नियोजन करत आहे.
पावसामुळे जमिनीत ओलावा नाही. त्यामुळे रान ओलावून शेतकऱ्यांना पेरणी करावी लागत आहे, नुकतीच शेतकऱ्यांनी काही ठिकाणी पेरणी केली आहे. उगवलेल्या पिकांना वीज नसल्याने वेळेमध्ये पाणी मिळत नाही. असे असल्याने पिके सुकून जाऊ लागली आहे. आता याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.वीज कंपनीच्या भोंगळ कारभारामुळे रब्बी हंगाम धोक्यात आली आहे, असा आरोप शेतकरी करत आहे. दरम्यान, यावर्षी खरीप हंगामातील सोयाबीन पीक हातातून गेले आहे. साहजिकच आता शेतकरी रब्बी हंगामातील पिकांवर अवलंबून आहे. परंतु आता महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे रब्बी हंगामही हातातून जातो की काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडत आहे.
विजेच्या सततच्या लपंडावामुळे रब्बी हंगाम धोक्यात आला आहे. पिकाला पाणी कसे द्यावे? असा संतप्त सवाल शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे. कंपनीकडून कमी दाबाने वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यात कृषिपंप पुरेशा क्षमतेने चालत नाही. या समस्या तातडीने सोडवाव्यात. याबाबत वरिष्ठांनी याकडे लक्ष देऊन विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम