शेतकऱ्यांनो कर्जमुक्ती होण्यासाठी ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती करा अपलोड !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २१ नोव्हेबर २०२३

राज्यातील अनेक शेतकऱ्यांवर कर्जाचा मोठा डोंगर असल्याने अनेक वेळी केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांच्या मदतीला येत असता, राज्यात सध्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजना पोर्टलवर ३० नोव्हेंबरपर्यंत माहिती अपलोड करण्यात यावी. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री तसेच कृषी मंत्र्यांनी जिल्हा उपनिबंधकामार्फत जिल्ह्यातील सर्व बँकांना सूचना दिलेल्या आहेत.

शेतकऱ्यांनी आपली माहिती पोर्टलवर ३० नोव्हेंबरपूर्वी अपलोड करावेत. यामुळे शेतकरी सवलतीपासून आपण वंचित राहणार नाहीत, असे आवाहन भाजपा प्रदेश सरचिटणीस आ. रणधीर सावरकर यांनी केली आहे.

राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी ही महत्त्वाची योजना सुरू केली होती. परंतु सरकार बदलल्यानंतर तीन वर्षे यावर महाविकास आघाडीच्या काळामध्ये काही करण्यात आले नाही. यासंदर्भात आ. सावरकर यांनी सहकाऱ्यांसह विधीमंडळात या प्रश्नावर सरकारचे लक्ष वेधले होते. लक्षवेधी तसेच विविध तारंकित प्रश्न तसेच सरकारकडे पाठपुरावा करून कर्जमाफी नियमित भरणाऱ्या शेतकऱ्यांना लाभ देण्यात यावा, त्यांना प्रोत्साहन रक्कम देण्यात यावी अशी मागणी केली होती. अकोला जिल्ह्यात या शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणावर असून त्यांना या योजनेचा लाभ मिळावा अशी मागणी केली. मागणीची सरकारने दखल घेतली असून ३० नोव्हेंबर पर्यंत या पोर्टल माहिती शेतकऱ्यांनी भरून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार संजय धोत्रे, आ. रणधीर सावरकर, आ. प्रकाश भारसाकळे, हरीश पिंपळे, वसंत खंडेलवाल यांच्यासह भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

 

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम