शेतकऱ्याकडे एक लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चौघांवर गुन्हा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २९ डिसेंबर २०२२ I मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून झाडे तोडण्याची परवानगी असून खोटेनाटे अर्ज करण्याची धमकी देत एक लाखांची खंडणी मागणाऱ्या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल नारायण देवकर, चेतन गुलाबराव तायडे (रा.आमदगाव, ता. बोदवड), अर्जुन रामा आसणे (रा. नाडगाव, बोदवड), अमोल भिका व्यवहारे (नाडगाव, ता. बोदवड) असे गुन्हा दाखल असलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

अशोक काशिनाथ सत्रे (वय ६०, रा. रांजणी ता. जामनेर), यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्यांनी जामठी शिवारातील शेतगट क्र.५१ चे शेताचे बांधावर असलेल्या झाडाची तोडण्याची (कापण्याबाबत) मुक्ताईनगर वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्याकडून परवानगी घेतलेली होती. तरी देखील अनिल नारायण देवकर, चेतन गुलाबराव तायडे, अर्जुन रामा आसणे, अमोल भिका व्यवहारे या चौघांनी झाडे तोडण्याचे कामात अडथळा निर्माण करून करुन एक लाख रुपयांची खंडणी मागीतली. तसेच तुम्ही खंडणी न दिल्यास आम्ही तुमच्याविरुध्द माहीती अधिकारात अर्ज टाकू. तुमच्या विरुध्द खोटेनाटे अर्ज करुन वृत्तपत्रात देखील तुमची बातमी छापू व तुमची बदनामी करु, अशी धमकी दिली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ वसंत निकम हे करीत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम