बिले थकविणाऱ्या कारखान्याच्या संचालकांवर यूपीत गुन्हा

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | साखर कारखान्याकडे जवळपास ३५ कोटी रुपयांची थकबाकी आहे.उत्तर प्रदेशातील प्रशासनाने याबाबत वारंवार निर्देश दिले आहेत. नोटिसा बजावल्या तरीही कारखान्याने याची दखल घेतली नाही.

त्यामुळे जिल्हाधिकारी हर्षिता माथुर यांच्या निर्देशानंतर जिल्हा ऊस विकास सहकारी समितीचे सचिव अशोक कुमार यांनी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आणि व्यवस्थापन विभागातील सहा अधिकाऱ्यांच्या विरोधात फसवणूक, जीवनावश्यक वस्तू अधिनियम आदी अंतर्गत सोरोंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

गळीत हंगाम २०२१-२२ मध्ये कारखान्याकडे ऊस बिलाची ३५.३० कोटी रुपयांची थकबाकी आहे. शिवाय कारखान्याकडे ८२.२२ लाख रुपये ऊस विकास अनुदान थकीत आहे. शेतकऱ्यांचे पैसे दिले नाहीत. यामुळे शेतकरी देखील आक्रमक झाले आहेत. सरकारने वारंवार निर्देश दिल्यानंतरही कारखान्याने ऊस बिले दिलेली नाहीत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम