कृषी सेवक | ८ नोव्हेंबर २०२२ | शेतामधुन अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारे २५ क्विंटल कापूस लंपास केल्याची घटना पाचोरा तालुक्यातील भोजे येथे घडली असून या मोठ्या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
भोजे – वरखेडी रोडवरील राजुरी खु” शिवारातील गावाजवळीक असलेल्या शेतातील पत्राचे शेडमधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे २ लाख ५० हजार रूपये किंमतीचा २० ते २५ क्विंटल कापूस चोरून नेल्याचे समोर आले आहे.शेतकरी देवराम शहादू माळी यांच्या दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी सहा वाजेच्या सुमारास हा प्रकार उघड झाला. .अज्ञात चोरट्यांविरुद्ध पिंपळगाव (हरेश्वर) पोलिस स्टेशन येथे भा. दं. वि. कलम ४६१ व ३८० नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सहाय्यक पोलिस निरीक्षक महेंद्र वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल पांडुरंग गोरबंजार तपास करीत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम