कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | सततच्या नापिकीला व कर्जबाजारीपणाला कंटाळून तालुक्यातील तारखेडा खु” येथील एका ५७ वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. याघटनेप्रकरणी पाचोरा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, तालुक्यातील तारखेडा खु” येथील शेतकरी रघुनाथ त्रंबक कुंभार (५७) यांनी सततच्या नापिकीमुळे व कर्जबाजारी झाल्याने तारखेडा शिवारातील शेत गट क्रमांक २४१/३ येथे विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली. घटनेबाबत ग्रामस्थांना कळताच रघुनाथ कुंभार यांना पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ. अमित साळुंखे यांनी तपसणी करून त्यांना मृत घोषित केले. त्यानंतर या घटने प्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयत रघुनाथ कुंभार यांचे पाश्चात्य पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम