खान्देशातील केळीला १५०० रुपयांपर्यंत मिळतोय भाव

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ | सध्या केळीची आवक कमी होत आहे. ही आवक पुढे आणखी कमी होईल. कारण कांदेबाग केळी बागांमधील काढणी पूर्ण होईल. सध्या खानदेशात चोपडा, जळगाव, जामनेर, यावल रावेर धुळ्यातील शिरपूर आदी भागांतील कांदेबाग केळीची काढणी पूर्ण होत आली आहे.
सध्या उशिरा लागवडीच्या बागांमध्ये काढणी सुरू आहे. सध्या कमी दर्जाच्या केळीला ७००, दर्जेदार केळीला १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळत आहे. यामुळे दरामध्ये अजून सुधारणा होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खानदेशात प्रतिदिन १६० ट्रक केळीची आवक होत आहे. या आवकेत मागील १५ ते १८ दिवसांत २० ट्रकनी घट झाली आहे. यामुळे दर स्थिर आहेत. मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर येथील बाजारातही प्रतिदिन १५० ट्रक केळीची आवक सध्या होत आहे. तेथेही कमाल दर १२०० ते १५०० रुपये प्रतिक्विंटल आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम