शेतकऱ्याने रेखाटली कांद्यावर नरेंद्र मोदींची मुद्रा

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ८ डिसेंबर २०२२ I सध्या कांद्याच्या दरात मोठी घसरण सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी सरकारकडे याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. आता शेतकऱ्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मागणी केली आहे.

नाशिक जिल्ह्यातील सटाणा येथील एका शेतकऱ्याने 20 कांद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुद्रा रेखाटली आहे. तर एका कांद्यावर दिवंगत शेतकरी नेते शरद जोशी यांचेही चित्र रेखाटले आहे.

यामुळे याचे फोटो व्हायरल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांसाठी पुरेसं काम करत नाहीत, त्यांचं शेतकऱ्यांकडं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्याने ही शक्कल लढवली आहे.

शेतकऱ्यांनो कमी वेळेत लाखोंची कमाईसाठी डुक्कर पालनाचा व्यवसाय फायदेशीर, वाचा सविस्तर

किरण दादाजी मोरे असे या शेतकऱ्याचं नाव आहे. शरद जोशी यांच्या जयंतीदिवशी कांद्यावर त्यांची मुद्रा काढली होती. सध्या कांद्याला कोंब फुटले आहेत. मात्र सरकारला अद्याप जाग आली नाही. म्हणून मी कांद्यावर नरेंद्र मोदी यांची मुद्रा काढल्याचे मोरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार होणं आवश्यक आहे. आज कांदा टिकला आहे पण भाव टिकाला नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यानं जगायचं कसं? असा प्रश्न निर्माण झाल्याचे मोरे यांनी सांगितले.

शेतकऱ्यांनो आता सुरु करा पशुखाद्य बनवण्याचा व्यवसाय, दुग्ध व्यवसाय आता वाढतच जाणार आहे..

दरम्यान, शेतकऱ्यांना आंदोलन करुनही काही मिळत नसल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाचा विचार होणं आवश्यक आहे, असेही ते म्हणाले. यामुळे भाव कधी वाढणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम