१५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना विमा अर्ज दाखलची मुदत

बातमी शेअर करा

कृषी सेवक I ८ डिसेंबर २०२२ I यावर्षी रब्बी हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गहू आणि हरभरा या पिकांसाठी गुरुवार १५ तारखेपर्यंत शेतकऱ्यांना विमा अर्ज दाखल करता येतील, अशी माहिती समोर येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. यामुळे आता तरी शेतकऱ्यांनी ही कामे उरकावीत.

याबाबत शेतकरी अनेकदा मागणी करत आहेत. अधिक माहितीसाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, संबंधित तालुका कृषी अधिकारी, जिल्हा बँक आणि राष्ट्रीयीकृत बँकांशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे. यामुळे शेतजऱ्यांना याबाबत माहिती असणे गरजेचे आहे

दरम्यान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग यांसारख्या टाळता न येणाऱ्या जोखमींमुळे पिकांच्या उत्पन्नात येणाऱ्या घटीपासून व्यापक विमा संरक्षण मिळणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम