कृषी सेवक | १७ नोव्हेंबर २०२२ | येथील शेतकऱ्याचा सर्पदंश झाल्याने उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना अमळनेर तालुक्यातील झाडी येथे घडली आहे. याबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिजाबराव खंडू पाटील (वय-५२) रा. झाडी ता.अमळनेर हे त्यांच्या झाडी शिवारातील शेतात बुधवार १६ नोव्हेंबर रोजी कपाशी वेचण्यासाठी गेले होते. दुपारी दीड वाजेच्या सुमारास शेतात काम करत असताना त्यांना सापाने चावा घेतला. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्यांचे भाऊ प्रवीण पाटील यांनी तातडीने त्यांना अमळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. दरम्यान येथील वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती मयत घोषित केले. या घटनेबाबत मारवड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल सचिन निकम करीत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम