कृषी सेवक | १७ नोव्हेंबर २०२२ | भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने भुसावळ न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना भुसावळ न्यायालयात घडली असून पोलिसांच्या सतर्कतेने फसला आहे.
बोदवड तालुक्यातील धोंडखेडा येथील शेतकरी दयाराम गोविंदा सोनसकर यांचे गेल्या अडीच वर्षापासून भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्याने दयाराम सुनस्कर यांनी भुसावळ न्यायालयात आत्मदहनाचा प्रयत्न केला . मात्र वेळीच शहर पोलीस कर्मचार्यांनी त्यांना ताब्यात घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला.
दयाराम सुनस्कर यांनी भुसावळ न्यायाधीश यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते की मला भूसंपादनाचे पैसे मिळत नसल्यामुळे मी भुसावळ न्यायालयाच्या आवारात १७ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता आत्मदहन करणार आहे.
याला सरकार जबाबदार राहील असे पत्रात म्हटले होते त्या अनुषंगाने न्यायाधीशांनी सदरील बाब भुसावळ शहर पोलिसांना कळविल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होऊन दयाराम सोनस्कर यांना ताब्यात घेऊन त्यांच्या वर कायदेशीर कारवाई केल्यानंतर त्यांना पुन्हा कोर्टामध्ये हजर करणार आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम