कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | शेतात गुरे चरणाच्या कारणावरून शेतकऱ्याच्या डोक्यात कुऱ्हाडीच्या दांडक्याने मारहाण करून गंभीर दुखापत करून परिवाराला जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी जळगाव तालुक्यातील रायपूर शिवारात घडला. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात 4 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय शांताराम धनगर रा. निमगाव ता.जि. जळगाव हा तरुण रविवार 13 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता विजय हा संजय माधव शिरुडे यांच्या शेतात गुरे चारत होता. याबाबत राग आल्याने संजय माधव शिरुडे, प्रमोद रवींद्र शिरुडे, गिरीश संजय शिरुडे, गणेश संजय शिरुडे सर्व रा. निमगाव ता. जि. जळगाव यांनी हातातील कुऱ्हाडीच्या दांडक्याने विजय याचे वडील शांताराम धनगर यांच्या डोक्यात टाकला. त्यानंतर विजय आणि त्याची आई कविता यांना धक्काबुक्की करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी सोमवारी १४ नोव्हेंबर रोजी रात्री शांताराम धनगर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी संजय शिरुडे, प्रमोद शिरुडे, गिरीश शिरुडे, गणेश शिरुडे यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीसस्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस नाईक मुदसर काझी पुढील तपास करीत आहे.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम