कृषी सेवक | १५ नोव्हेंबर २०२२ | अडावद कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सबयार्डातील व्यापाऱ्याच्या दुकानातून दीड लाखाची चोरी झाल्याची घटना सोमवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ अवघ्या अर्ध्या तासात मुद्देमालासह दोन चोरट्यांना अटक केली आहे.
येथील सबयार्डात व्यापारी वर्गासाठी गाळे बांधण्यात आले आहे. यात नितीन दहाड या व्यापाऱ्याचे दुकान क्रमांक ४ आहे. या व्यापाऱ्याने दुकानातील कपाटात शेतकऱ्यांना देण्यासाठी सुमारे दीड लाख ठेवले. कामानिमित्त दुकाना बाहेरील काट्यावर गेले असता अज्ञात चोरट्याने हात साफ करत कपाटातील सुमारे दीड लाख रुपये लंपास करत पलायन केले. . व्यापारी नितीन दहाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अडावद अज्ञात ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता..
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम