भालोद येथे शेतकऱ्याच्या कपाशीला एकाने लावली आग

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ११ नोव्हेंबर २०२२ | शेतकर्‍याने नफ्याने केलेल्या कपाशीला गावातीलच एकाने पेटती काडी टाकून आग लावल्याची  घटना गावाबाहेर बुधवारी घडली. या प्रकरणी एकाविरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

दीपक श्रीराम कोळी ३८, कोळीवाडा, भालोद) यांच्या तक्रारीनुसार, त्यांनी नफ्याने केलेल्या शेतीतून दोन लाख ७० हजार रुपये किंमतीचे ३० क्विंटल कपाशी निघाल्यानंतर ही कपाशी जि.प.शाळेसमोरील पटांगणावर वाळवण्यासाठी टाकल्यानंतर संशयीत आरोपी निलेश दिलीप पाटील (भालोद) याने कुठल्यातरी कारणातून कपाशीला पेटती काडी टाकून आग लावल्याने नुकसान झाले. या प्रकरणी निलेश पाटील विरोधात फैजपूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार गोकुळ बुधा तायडे करीत आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम