उसाचे वजन मोफत करून देणार – चरणराज चवरे

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १० नोव्हेंबर २०२२ |सध्या ऊस दरासह उसाच्या वजनामध्ये काटामारीच्या आरोपामुळे चर्चा सुरू आहे. अनेक कारखान्यात काटामारी होते, असे म्हटले जात आहे.शिंदे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांनी पेनुर येथे स्वखर्चातून वजन काटा बसविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावरून कुठल्याही कारखान्याला जाणाऱ्या उसाचे वजन मोफत करून देणार असल्याची माहिती जिल्हाप्रमुख चवरे यांनी दिली.

यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे शेतकरी, ऊस तोडणी मजूर व वाहन मालक यांनी स्वागत केले आहे. यामुळे शेतकऱ्यांना आपल्या उसाच्या वजनाबाबत सविस्तर माहिती मिळणार आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम