परतीच्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ |परतीच्या पावसामुळे सर्व पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. याची भरपाई मिळण्यासाठी ‘ई-पीकपाणी’ नावाची नवीन व्यवस्था शेतकऱ्यांच्या माथी मारली आहे. त्याच्या मर्यादा लक्षात घेता प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करणे गरजेचे आहे.

जून ते सप्टेंबरपर्यंतच्या काळात पडणारा पाऊस हा संपूर्ण वर्षाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवत असतो. अन्न, धान्य उत्पादन आणि महत्त्वाचे म्हणजे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न यावर विसंबून असतो. पाऊस जर पुरेसा आणि योग्य वेळी बरसला नाही तर पाण्याचे भीषण संकट निर्माण होते. मान्सूनचे असमान वितरण ही आज देशापुढील प्रमुख समस्या बनली आहे. पावसाची सरासरी ही मान्सूनचा चांगला फायदा झाला हे दर्शवण्यासाठी पुरेशी नसून पावसाचे वितरण कसे झाले हा घटकही अधिक महत्त्वाचा ठरतो.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम