१२ व्या हप्त्याचे २००० रुपये मिळाले नसल्यास काय करावे ?

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १७ ऑक्टोबर २०२२ |आता १२ व्या हप्त्याचे देखील पैसे सर्व लाभार्थ्यांना ट्रान्सफर करण्यात आले आहेत. मात्र जर आपल्याला या १२ व्या हप्त्याचे २००० रुपये मिळाले नसतील तर यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.

हफ्ता थांबविण्यामागील कारणे

PM Kisan योजनेमध्ये रजिस्ट्रेशन करताना एखादी माहिती, चुकीचा पत्ता किंवा बँक खात्याची माहिती भरण्यात चूक झाली असेल तरीही हप्ता मिळणार नाही. राज्य सरकारकडून दुरुस्ती प्रलंबित असल्यास पैसे मिळणार नाहीत. NPCI मध्ये आधार सीडिंग नसले तरीही PM किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत, पब्लिक फायनान्शिअल मॅनेजमेंट सिस्टीम (PFMS) रेकॉर्ड स्वीकारत नाही. बँकेची रक्कम इनव्हॅलिड असेल तरीही योजनेचे पैसे येणार नाहीत.

असे तपासा

आपल्याकडून भरण्यात आलेली माहिती बरोबर आहे की नाही हे तपासण्यासाठी PM Kisan सन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. सर्वांत आधी https://pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर जा. उजव्या बाजूला Farmers Corner असे लिहिलेले दिसेल. त्यावर क्लिक करा. त्यानंतर बेनिफिशियरी स्‍टेटस वर क्लिक करा. यानंतर आधार नंबर, खाते क्रमांक आणि फोन नंबरचा पर्याय दिसेल. आधार नंबर टाका आणि GATT डेटावर क्लिक करा. यांनतर आपली सर्व माहिती आणि पीएम किसानच्या हप्त्यांचे तपशील समोर दिसतील. इथे आपण दिलेली सर्व माहिती बरोबर आहे की नाही ते तपासा.

अशी करा तक्रार

मात्र जर आपण दिलेली सर्व माहिती बरोबर असूनही बँक खात्यात पैसे आले नाहीत तर हेल्पलाइन डेस्कची मदत घेता येईल. यासाठी टोल फ्री नंबर 011-24300606 आणि हेल्पलाइन नंबर 155261 वर कॉल करून तक्रार नोंदवता येईल. तसेच https://[email protected] या ई-मेल आयडीवर ईमेल द्वारे तक्रार नोंदवून मदत मिळवता येईल.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम