मराठवाडा कृषी विद्यापीठतर्फे करडईचे नवीन वाण विकसित

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत परभणी येथील अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पांद्वारे करडईचे एकाहून एक सरस वाण विकसित करण्यात आले आहेत. हे वाण महाराष्ट्रासह इतर राज्यांत पोहोचले आहे. संशोधन केंद्राच्या शिफारशींमुळे एकरी उत्पादकता वाढली आहे.

रब्बी हंगामातील करडई हे महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. अवर्षण स्थितीमध्येही उपलब्ध ओलाव्यावर करडईचे चांगले उत्पादन मिळते. देशात करडईच्या उत्पादनात महाराष्ट्र अग्रेसर आहे. करडईच्या बियांपासून तेल तसेच फुलांपासून रंगनिर्मिती केली जाते.
मराठवाडा विभागातील जमीन आणि शेतकऱ्यांच्या गरजांवर आधारित संशोधन सुरू झाल्यानंतर बदनापूर येथील संशोधन केंद्रातर्फे ‘शारदा’ हा वाण विकसित करण्यात आला. त्यानंतर तत्कालीन मराठवाडा कृषी विद्यापीठात १९९३ मध्ये भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत केंद्र आणि राज्य शासनाच्या निधीतून अखिल भारतीय समन्वयीत करडई संशोधन प्रकल्पाची सुरुवात झाली. आजवर केंद्राने करडईचे ५ वाण विकसित केले आहेत. केंद्रांचे पहिले प्रभारी अधिकारी आणि पैदासकार डॉ. बी. एम. जोशी, तर दुसरे प्रभारी अधिकारी डॉ. यू. व्ही. काळे होते. डॉ. जोशी यांनी २००२ मध्ये परभणी-१२ (परभणी कुसुम) हा वाण विकसित केला. त्यानंतर २००७ मध्ये डॉ. जोशी आणि डॉ. श्यामराव घुगे यांनी परभणी ४० हा वाण विकसित केला.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम