हरभऱ्याला विदेशात मागणी वाढली

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २१ डिसेंबर २०२२ I हरभरा दर सध्या सरासरी ४ हजार ४०० ते ४ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान आहेत. किमान दरात हरभऱ्याला प्रक्रिया उद्योगांकडून चांगला उठाव मिळतो.

 

त्यामुळं नाफडेच्या विक्रीनंतर दर जास्त घसरले नाहीत, असंही व्यापाऱ्यांचं म्हणणये. तर गुणवत्तापूर्ण हरभऱ्याला मुंबई, दिल्ली, इंदोर, जयपूर आदी महत्वाच्या बाजारांमध्ये ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळतोय. मात्र दर अद्यापही हमीभावापेक्षा कमी आहेत. हरभऱ्याच्या दरात पुढली काळात मर्यादीत वाढ होऊ शकते, असेही बाजारातील जाणकारांनी सांगितलं. मात्र काबुली हरभरा सध्या चांगला भाव खातोय. भारतातील काबुली हरभऱ्याला दुबई, सौदी अरेबिया आणि कोलंबो या देशांमधून मागणी वाढली. त्यामुळं मागील आठवडाभरात काबुली हरभऱ्याच्या दरात क्विंटलमागे २०० ते ३०० रुपयांची वाढ झाली.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम