१०० ते ११० टन उत्पादन देणाऱ्या उसाच्या नवीन जातीचा लागला शोध

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २ डिसेंबर २०२२ I नर्मदापुरममधील पवारखेडा येथील मुख्य ऊस संशोधन केंद्रात तयार केलेले बियाणे (कोजेएन ९५०५) शेतकऱ्यांच्या जीवनात गोडवा निर्माण करणार आहे. यापासून उत्पादनही ११०० क्विंटल प्रती हेक्टर मिळेल. यामुळे याचा शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. मध्य प्रदेश कृषी विभागाने शेतकऱ्यांसाठी हे बियाणे प्रसारीत केले आहे.

संशोधन केंद्राच्या चार शास्त्रज्ञांनी उसाचे वाण विकसित केले आहे. यामध्ये सर्वाधिक उत्पादन देणारे बियाणे कोजेएन ६६/६०० आहे. या बियाण्यापासून उत्पादन अधिक मिळते, मात्र कालावधी अधिक लागतो. मध्य् प्रदेशात उसाच्या दहा प्रजाती जादा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे.

यावर्षी कोजेएन ९५०५ मध्ये २२ टक्के साखर आढळली. दहा ते चौदा महिन्यात १०० ते ११० टन उत्पादन यापासून मिळेल. संशोधन केंद्रात नव्या प्रजातीचे बियाणे उपलब्ध असल्याचे संशोधक ऑस्कर टोपो यांनी सांगितले. एक हेक्टरमध्ये जवळपास १,१०० क्विंटल ऊस उत्पादन देणाऱ्या उसाच्या नव्या वाणाची निर्मिती शास्त्रज्ञांनी केली आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम