कृषी सेवक I २ डिसेंबर २०२२ I राज्यातील दोन जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्या असल्याची माहिती समोर आली आहे. चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात या खाणी असल्याचे सांगितले जात आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली. त्यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला.
याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातं आहे. यामुळे यामध्ये खरेच सोनं सापडले तर याचा नक्कीच फायदा होईल. यामुळे याबाबत आता शोध घेतला जात आहे. याठिकाणी सोन्याचे दोन ब्लॉक आहेत.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम