कृषी सुवर्ण कर्ज योजना

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ नोव्हेंबर २०२२ I कृषी सुवर्ण कर्ज योजना हि शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. विविध कृषिपूरक व्यवसाय आणि यंत्रसामग्रीसाठी बँकेद्वारे ‘कृषी सुवर्ण कर्ज योजना’ सुरू करण्यात आली आहे. या योजनेमध्ये शेतकऱ्यांना आपल्याकडील सोने बँकेत तारण ठेवून कर्ज घेता येते.
कृषी सुवर्ण कर्ज योजनेचे फायदे

या कर्जासाठी इतर कर्जांच्या तुलनेत कमी कागदपत्रांची पूर्तता करावी लागते.
आवश्यक कागदपत्रांची पूर्तता केल्यानंतर त्वरित कर्ज मंजुरी मिळते.
कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध होते.
कर्जदाराकडील सोन्याच्या शुद्धतेवर आणि बाजार मूल्यानुसार कर्जाची रक्कम ठरविली जाते.
सोन्याच्या किमतीप्रमाणे कर्जाची योग्य रक्कम ठरविली जाते.
तारण ठेवलेले सोने बँकेत पूर्णतः सुरक्षित राहते.

योजनेसाठी पात्रता

सर्व शेतकरी वर्ग
कृषी उद्योजक
कोणतीही व्यक्ती जी कृषी किंवा संबंधित व्यवसायामध्ये गुंतलेली आहे.
पात्र व्यक्तीच्या नावे जमिनीची नोंद किंवा कृषी उपक्रमांचे पुरावे असणे बंधनकारक.
फक्त शेतकऱ्यांनाच योजनेचा लाभ घेता येतो.

कृषी सुवर्ण कर्ज कशासाठी मिळते?

पीक लागवड व व्यवस्थापनसाठी.
शेतीसाठी यंत्रसामग्री, जमीन खरेदी, किंवा सिंचन उभारणी करणे.
कृषी उत्पादने, फलोत्पादन व वाहतूक यांसाठी.
दुग्ध व्यवसायासाठी जनावरांची खरेदी, कुक्कुटपालनासाठी कोंबड्या खरेदी, शेड उभारणी करणे.
मत्स्य व्यवसायामध्ये तलाव बांधणी, मत्स्य खरेदी आणि विपणन सुविधा इत्यादी कृषिपूरक व्यवसाय करण्यासाठी.
शेळ्या-मेंढ्या खरेदी करण्यासाठी.

आवश्यक कागदपत्रे

योग्यरीत्या भरलेला अर्ज
पासपोर्ट आकाराचा फोटो.
अर्जदाराची केवायसी कागदपत्रे (पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड)
पीक लागवडीचा पुरावा
वित्तीय संस्थेद्वारे मागणी केलेली इतर कागदपत्रे
अर्जदाराच्या नावे असलेल्या जमिनीची कागदपत्रे

पात्रता निकष

अर्जदार हा भारताचा नागरिक असावा.
बँकेद्वारे मागणी केलेल्या केवायसी मार्गदर्शक तत्त्वांची पूर्तता करण्यास अर्जदार सक्षम असावा .
अर्जदाराचे वय किमान १८ ते कमाल ६५ वर्षे असावे.
अर्जदार भारत सरकार किंवा रिझर्व्ह बँकेच्या नियमांतर्गत व्यवसाय करीत असावा.
अर्जदार शेती किंवा कृषी संलग्न व्यवसाय करीत असावा.

टीप – कृषी सुवर्ण कर्जासाठी प्रत्यक्ष बँकेस भेट देऊन पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी. पात्रता निकष आणि आवश्यक कागदपत्रे ही प्रत्येक बँकेनुसार भिन्न असू शकतात.

कृषी सुवर्ण कर्ज योजनेची वैशिष्ट्ये (२०२२)

कर्ज रक्कम – १ हजार ते २५ लाख रुपये
व्याजदर – ७ टक्के (वार्षिक)
परतफेड – सुलभ हप्त्यामध्ये
तारण वस्तू – सोन्याच्या दागिन्यांची गुणवत्ता आणि वजनानुसार त्याचे मूल्य ठरविले जाते.
कार्यकाळ – १ महिन्यापासून ते ३६ महिने
कर्ज प्रक्रियेसाठी घेण्यात येणारे शुल्क – कर्ज रकमेच्या १ टक्का

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम