हिंगोली बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला दर

बातमी शेअर करा

कृषी सेवक I २८ नोव्हेंबर २०२२ I हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत धान्य बाजारात शनिवारी सोयाबीनची १८५० क्विंटल आवक झाली. सोयाबीनला प्रतिक्विंटल किमान ५०५० ते कमाल ५६९५ रुपये तर सरासरी ५३७२ रुपये दर मिळाले.हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवार (ता.२१) ते शनिवार (ता. २६ ) या कालावधीत सोयाबीनची ८८९९ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल सरासरी ५३६७ ते ५५७५ रुपये दर मिळाले. गुरुवारी (ता.२४) सोयाबीनची २५०० क्विंटल आवक झाली. दर प्रतिक्विंटल किमान ५१९० ते कमाल ५८०० रुपये तर सरासरी ५४९५ रुपये मिळाले. शुक्रवारी (ता.२५) १५०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ५००० ते कमाल ५७३५ रुपये तर सरासरी ५३६७ रुपये दर मिळाले.

paid add
बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम