कृषी सेवक | ११ एप्रिल २०२४ | वातावरणातील बदलाचा सामना करण्यासाठी आणि पीक उत्पादनात वाढ करण्यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील तज्ज्ञांनी ‘सेंसर बेस’ नावाची खास यंत्रणा विकसित केली. सदर यंत्रणा शेतकर्रीराज्यासाठी हवामान बदलाची अचूक माहिती देऊन योग्य ती पीक व्यवस्थापन रणनीती आखण्यास मदत करते.
पोर्टेबल यंत्रणा: ही यंत्रणा वापरण्यास पोर्टेबल आहे. सदर यंत्रणा ३ ते ६ हजार रूपयांमध्ये उपलब्ध आहे. तापमान आणि आर्द्रता यासारख्या मूलभूत हवामान घटकांची माहिती या द्वारे मिळते.
अचूक यंत्रणा: ४० हजार ते २ लाख रूपयांमध्ये उपलब्ध असलेली ही यंत्रणा तापमान, आर्द्रता, पाऊस, वाऱ्याचा वेग आणि सूर्यप्रकाशाचे तास यासारख्या विविध हवामान घटकांची अत्यंत अचूक माहिती देते.
पारंपरिक वेदर स्टेशनपेक्षा ‘सेंसर बेस’ यंत्रणा जलद आणि अधिक कार्यक्षम आहे, त्यामुळे वेळेची बचत होते.
सदर यंत्रणा विविध हवामान घटकांची माहिती देते, ज्यामुळे शेतकर्यांना हस्तितजास्त माहिती मिळाल्याने शेतकरीराजा पिकांचे अधिक चांगल्या प्रकारे व्यवस्थापन करू शकतात.
शेतकर्यांना यंत्रणेद्वारे जमा झालेली हवामान माहिती त्यांच्या मोबाइल ॲपवर मिळते.
या यंत्रणेचा वापर करून शेतकरी पाणी आणि ऊर्जेची देखील बचत करू शकतात.
विद्यापीठाने शेतकर्यांच्या गरजेनुसार आणि त्यांना परवडणाऱ्या दरात विविध प्रकारची ‘सेंसर बेस’ असलेल्या यंत्रणा विकसित केल्या आहे.
पोर्टेबल यंत्र ३ हजार मध्ये उपलब्ध आहे आणि तापमान आणि आर्द्रता याची माहिती देते.
प्रगत लो कॉस्ट हवामान केंद्र ५००० रूपयांमध्ये उपलब्ध असलेले हे यंत्र पाऊस, आर्द्रता आणि तापमान याची माहिती देते.
कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम