आळंबीची लागवड शेतीसाठी चांगला पूरक उद्योग

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | आळंबी ही बुरशी गटातील एक वनस्पती असून याची लागवड प्रामुख्याने पूर्व आशिया तसेच तैवान, चीन, कोरिया तसेच इंडोनेशिया इत्यादी देशात मोठ्या प्रमाणावर केली जाते. भारतामध्ये देखील आळंबीचे उच्च तंत्रज्ञानावर आधारित उत्पादन सुरू झाले असून आता व्यावसायिक दृष्टिकोनातून आळंबी उत्पादन शेतकरी करू लागले आहेत. आळंबी लागवडीसाठी चांगले स्पॉन अर्थात बी तयार करणे हा शेतीसाठी एक चांगला पूरक उद्योग धंदा ठरू लागला आहे.

महिला वर्गासाठी हा व्यवसाय खूप महत्त्वपूर्ण असून महिलांसाठी आर्थिक स्थैर्य देण्याची क्षमता या व्यवसायात आहे. या लेखामध्ये आपण आळंबी लागवडीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबींची माहिती करून घेणार आहोत.

paid add

1- लागणारी जागा- आळंबी उत्पादना करता जागा ही बंदिस्त स्वरूपाची आवश्यक असते. यासाठी झोपडी किंवा बांबू हाऊस किंवा एखादे मातीचे घर यामध्ये आळंबी उत्पादन अत्यंत उत्तम पद्धतीने घेता येते व त्या माध्यमातून चांगला नफा देखील मिळतो.
2- पाण्याच्या आवश्यकता- आळंबी उत्पादनासाठी पाणी ही एक अत्यंत महत्त्वाची बाब असून आळंबी उत्पादनाकरिता पाणी स्वच्छ व शुद्ध असणे खूप गरजेचे असते. नाहीतर उत्पादनावर विपरीत परिणाम संभवतो.
3- आळंबी उत्पादनासाठी लागणारा कच्चामाल- आळंबी उत्पादनासाठी कच्चामाल म्हणून गव्हाचा भुसा, कपाशीच्या पराट्या, भाताचा पेंडा तसेच गवत, सोयाबीनचा भुसा आणि कडबा इत्यादी शेतातीलच कच्चामालाची आवश्यकता असते.
आळंबी चे सगळे उत्पादन हे कच्च्या मालावर अवलंबून असल्यामुळे कच्च्या मालातील सेल्युलोज हा घटक आळिंबीचे प्रमुख अन्न आहे. सेल्युलोज ज्या घटकात अधिक असते त्यावर आळंबीचे उत्पादन अधिक येते. असे घटक पदार्थांची निवड करताना ते कोरडे असणे खूप गरजेचे असून हे नवीन काढणीचे असावेत. पावसात भिजलेले नसावेत.
4- प्लास्टिक आवश्यक- आळंबी उत्पादनाकरिता प्लास्टिक पॉली प्रोपीलिनचे यांचे वापरावे लागते. त्याची गेज 80 ते 100 इतके असावी. प्लास्टिकचा आकार 18 बाय 22 इंच किंवा 22 बाय 27 इंचाचा असावा.
5- आळिंबीची बियाणे- आळंबीच्या बियाण्यास स्पॉन असे म्हणतात. गव्हाच्या दाण्यावर आळंबीच्या बिजाणूंची वाढ केली जाते व प्लॅस्टिकच्या पिशवीत 500 ग्राम, एक किलो या मापामध्ये हे बियाणे उपलब्ध असते.
6- लागणारे वातावरण- आळंबीच्या आपल्या उत्पादनासाठी वातावरण हे अंधकारमय असणे गरजेचे आहे. हवेतील आद्रता 70 ते 80% व तापमान 18 ते 28°c असावे. चांगल्या उत्पादनाकरिता खेळते हवा असणे खूप महत्त्वाचे आहे.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम