गव्हाच्या दरात प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढ

बातमी शेअर करा

कृषी सेवक | ४ नोव्हेंबर २०२२ | गव्हाच्या दरात प्रति क्विंटल ६०० ते ८०० रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. यामुळे आता हंगामात गव्हाचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. रशिया युक्रेन युद्धामुळे ही वाढ होत असल्याचे सांगितले जात आहे. देशात यंदा गव्हाचे उत्पादनही घटलं आहे.

त्याचा परिणाम किंमंतीवर होत आहे. यामुळे महाराष्ट्रातही गव्हाच्या किंमतीत वाढ होत आहे. यामुळे आता तुमच्या ताटातील पोळी महागणार आहे. नर्मदा सागर, चंदोशी, आणि सरिता सागर या गव्हाच्या किमतीत ही वाढ झाली आहे.३५०० वर हे दर आता गेले आहेत.

paid add

आता यावर्षी हवामानावर आणि उत्पादनावर हे दर अवलंबून राहणार आहेत.पुण्यात गव्हाच्या दरांमध्ये दोनशे ते तीनशे रुपयांची वाढ झाली आहे. तर नागपूरमध्ये पाचशे रुपयांपर्यंत वाढले आहेत.

बातमी शेअर करा

कृषी सेवकचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम