मेळघाटातील वीज समस्या मार्गी लावणार – देवेंद्र फडणवीस

बातमी शेअर करा

कृषी सेवक | १९ ऑक्टोबर २०२२ मेळघाटातील धारणी व चिखलदरा तालुक्यांतील २४ गावांमध्ये स्वातंत्र्यापासून अजूनही वीज पोहोचली नव्हती. या भागातील आदिवासी बांधव ७५ वर्षे काळोखातच होते. मात्र आमदार राजकुमार पटेल यांच्या प्रयत्नाने या गावांत आता वीज पोहोचणार आहे. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेळघाटातील वीजसमस्या तातडीने निकाली काढणार असल्याचे आश्वासन आमदार पटेल यांना दिले. वीज नसलेल्या २४ गावांमध्ये माखला, भवई, पिपल्या, खामदा, नवलगाव, मारिता, टेम्बरू, किनी खेडा, रायपूर, चोपन, रिटायखेडा, कोपमार, सावलीखेडा, रक्षा, चूणखडी, कुंड, माडी झडप, रंगूबेली, खडीमल, सुमीता, बोराट्या खेडा, धोकडा, बिच्छू खेडा व खुटीदा इत्यादी गावांचा समावेश आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन चर्चा केली.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment