डाळिंबानंतर आता पेरुचे भाव वाढले

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २० नोव्हेबर २०२३

शेतकरी नेहमीच विविध प्रयोग करून शेतीतून चांगले उत्पन्न घेत आहे. यामुळे शेतकऱ्याचा आर्थिक फायदा देखील होत आहे. यात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे नियोजन जर योग्य असेल तर उत्पन्न चांगले मिळते. शेतकऱ्यांना सतत वेगवेगळ्या संकटांचा सामना करावा लागतो. यात अनेकदा काही पिकांना चांगले बाजारभाव मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट येते.

टोमॅटो पाठोपाठ डाळिंबाला अच्छे दिन आले होते. त्यामुळे टोमॅटो आणि डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांची चांदी झाली होती. डाळिंबानंतर आता पेरुचे भाव वाढले आहेत. श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत एका शेतकऱ्याच्या पेरूला 60 रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. मनोजकुमार आगे असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

विशेष म्हणजे मनोजकुमार आगे यांनी सेंद्रीय पध्दतीने पेरूची लागवड केली आहे. शिवाय योग्य नियोजन त्यांनी केले होते. त्यामुळे चांगला दर्जा आणि चविष्ट पेरूला बाजारात चांगला भाव मिळाला. त्यामुळे आगे कुटुंबात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे सेंद्रीय फळं हे खूप रसाळ आणि गोड असतात. त्यावर कसलीच प्रक्रिया केली नसते, हे फळ आरोग्यासाठी उत्तम असते. अलीकडच्या काळात अनेकांना वेगवेगळे आजार चटकन जडतात. यात कॅन्सरचा जास्त धोका असतो. त्यामुळे हल्ली लोक कोणत्याही रसायनाशिवाय लागवड केलेली फळे, पिके खातात. साहजिकच सेंद्रीय फळ आणि धान्याला चांगला भाव मिळत आहे. परदेशातही त्याची मागणी वाढली आहे. शेतकरीही सेंद्रीय पिकांच्या लागवडीवर भर देत आहेत.

बातमी शेअर करा
#pomegranate
Comments (0)
Add Comment