बटाट्याची मोठी आवक मात्र भाव स्थिर !

बातमी शेअर करा

कृषीसेवक | २२ नोव्हेबर २०२३

देशात कांदा महागला होता तर यात केंद्र व राज्य सरकारने नुकतेच मार्ग काढला आहे मात्र यानंतर आता बटाट्याची मोठी आवक असतांना देखील बाजारातील भाव मात्र स्थिर आहे. गुलटेकडी येथील छत्रपती शिवाजी कृषी उत्पन्न बाजार समितीत आग्रा आणि स्थानिक भागातून बटाट्याची दररोज सरासरी ५०० टनांची आवक सुरू आहे. तर दहा किलोचे दर १०० ते १५० रुपयांच्या दरम्यान असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.

सध्या मध्य प्रदेशातील इंदूर भाग, आग्रा भागातून दररोज ३०० टनांची आवक होत आहे. तर पुणे विभागातून तळेगाव, सातारा पुसेगाव आणि पुणे जिल्ह्यातील खेड, जुन्नर, आंबेगाव या तालुक्यांतून कमीअधिक प्रमाणात बटाट्याची आवक सुरू आहे. दिवाळी सणामुळे बाजारात कमी मागणी आहे. त्यातच आवकही तुलनेत बऱ्यापैकी असल्याने दरही काही स्थिर आहेत. किरकोळ बाजारात बटाट्याची प्रति किलो २० ते ३० रुपयांच्या दरम्यान विक्री सुरू आहे. गेल्या रविवारी बट्याट्याची ३० ट्रक आवक झाली होती. गेल्या एक महिन्यापूर्वी बटाट्याची आवक जास्त होते. परंतु त्यानंतर आवकेत काही प्रमाणात घट झाली असून सध्या २५ ते ३० गाड्याची आवक सुरू आहे. परंतु ग्राहक कमी असले तरी दर स्थिर आहेत.

बातमी शेअर करा
#potatoes
Comments (0)
Add Comment