कापूस बाजार स्थिर

बातमी शेअर करा

 कृषी सेवक I २४ डिसेंबर २०२२ I देशातील कापूस बाजार (Cotton Market) आज स्थिरावला होता. काही बाजारांमध्ये दरात किंचित घसरण पाहायला मिळाली. मात्र मोठी घट कुठे दिसून आली नाही.

 

काल कापसाचे दर (Cotton Rate) क्विंटलमागे २०० रुपयांपर्यंत नरमले होते. मात्र आज कापूस दर आहे त्या पातळीवर होते. आज कापसाला सरासरी प्रतिक्विंटल ७ हजार ८०० ते ९ हजार रुपये दर मिळाला. तर राज्यातील भावपातळी ७ हजार ५०० ते ८ हजार ७०० रुपयांच्या दरम्यान आहे. ही दर पातळी पुढील काही दिवस दिसू शकते, असा अंदाज कापूस बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment