जीएम मोहरीला दिलेली परवानगी मागे घेण्याची मागणी

बातमी शेअर करा

कृषी सेवक I १५ डिसेंबर २०२२ I पर्यावरणावर होणारे दूरगामी परिणाम त्यासोबतच विदेशी कंपन्यांवर वाढणारी अवलंबिता अशा बाबी दुर्लक्षित करून देशात जीएम (जनुकीय परावर्तित) मोहरीच्या लागवडीला परवानगी देण्यात आल्याचा आरोप कृषी वैज्ञानिक मंचच्या तज्ज्ञांनी केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत थेट पत्र लिहीत जीएम मोहरीला दिलेली परवानगी मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यासोबतच पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर देशाच्या संकल्पनेला नख लावण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोपही या तज्ज्ञांनी केला आहे.

भाभा ॲटोमिक रिसर्च सेंटरचे माजी तज्ज्ञ डॉ. शरद पवार, कृषी विद्यापीठाचे माजी शास्त्रज्ञ डॉ. के. बी. वंजारी, माजी कुलगुरू डॉ. शरद निंबाळकर यांच्यासह इतर तज्ज्ञांचा या वैज्ञानिक मंचमध्ये समावेश आहे. जीएम मोहरीला परवानगी देताना अनेक शास्त्रीय बाबी नजरेआड केल्या आहेत, असा गंभीर आरोप या पत्रातून केला आहे.

बातमी शेअर करा
Comments (0)
Add Comment