‘या’ कारणाने होतेय कांदा उत्पादनात मोठी घट

बातमी शेअर करा

कृषीसेवक | १४ नोव्हेबर २०२३

देशभरात गेल्या काही महिन्यापासून कांद्याचा प्रश्न चांगलाच तापला असून खरीप हंगामातील कांदा बाजारात येण्यास उशीर होत असल्याने मागील पंधरवड्यात कांद्याचे भाव गगनाला भिडले होते. केंद्र सरकारने केलेल्या हस्तक्षेपानंतर कांदा दर काहीसे नरमले आहेत. मात्र देशभरातच नव्हे तर जगभरात हवामानातील बदल आणि पावसाअभावी कांदा पिकाच्या लागवडीखालील क्षेत्रात घट झाल्याची बातमी समोर येत आहे. त्यामुळे जागतिक कांदा उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे.

जगभरातील कांदा क्षेत्रातील व्यापारी, संशोधक आणि तज्ज्ञाची एकत्रित 27 वी युरोनियन बैठक शुक्रवारी पार पडली. या बैठकीदरम्यान ही माहिती समोर आली आहे. या बैठकीला स्पेन, इंग्लंड, नेदरलँड, डेन्मार्क, पोलंड, फ्रान्स, अमेरिका, इटली आणि जर्मनीसह विविध देशांचे प्रतिनिधी उपस्थित होते. इटलीतील अन्नप्रक्रिया उद्योग व वितरक कंपनी बुलटेक इम्पियान्टी आणि जगातील आघाडीची बियाणे विक्रेता कंपनी ‘हजेरा’ यांनी या बैठकीचे आयोजन केले होते.

ब्रिटनमध्ये ‘फ्यूसेरियम’ किडीचा प्रादुर्भाव
२०२३ या वर्षात हवामान बदल तसेच अत्यल्प पावसाचा कांदा पिकावर मोठा परिणाम झाल्याचे सर्व देशांतील प्रतिनिधींनी नमूद केले. अगदी कांदा लागवड करण्यापासून ते काढणीपर्यंत प्रत्येक पातळीवर याचा परिणाम दिसून आला आहे. इतकेच नाही तर कांदा साठवणुकीस अडचण आल्याचे काही प्रतिनिधी बैठकीत सांगितले. ब्रिटनमध्ये कांदा पिकावर ‘फ्यूसेरियम’ या किडीचा सर्वाधिक प्रादुर्भाव झाला असल्याचे ब्रिटनच्या प्रतिनिधींनी सांगितले.

बातमी शेअर करा
#onion
Comments (0)
Add Comment